Tuesday, August 17, 2010

कधी वाटल नव्हतं…

One more nice poem I found from the blog: http://davbindu.wordpress.com

तुला पहिल्या वेळी पाहिल्यावर
पुढे असं काही होईल, कधी वाटल नव्हतं
तू मला भेटण्याआधी खरंतर
प्रेम म्हणजे काय कधी कळलंच नव्हतं…
.
.
गर्दीत एकटा दिवस पुढे ढकलतांना
जीवनात अशी बहार येईल, कधी वाटल नव्हतं
खरंच तुझ्या भेटीनंतर जाणवलं
आजवरचं जगण हे तर जगंणच नव्हतं…
.
.
तुझ्या प्रत्येक गोष्टीत
मी असा गुंतेन, कधी वाटलं नव्हतं
तुझ्या त्या अथांग नजरेत हरवून
कसा तुझाच होत होतो हे समजतच नव्हतं…
.
.
तुझा सहवास, तुझा तो स्पर्श
असं वेड लावेल, कधी वाटलं नव्हतं
तुफ़ान पावसांतही कोरडा राहणारा मी
हलक्या सरीतही कसा भिजत होतो उमगतच नव्हतं…
.
.
व्याकुळ होऊन तुझी वाट पाहतांना
कोणासाठी असा झुरेन, कधी वाटल नव्हतं
आपल्या दुराव्याचा तो एक एक क्षण
असा मरणासारखा छ्ळेल हे खरंतर पटतंच नव्हतं…
.
.
माझ्या जीवनात कोणी अस हळुवार येऊन
माझ जीवनच बनून जाईल, कधी वाटल नव्हतं
अन माझ्या जीवनातील वाळवंटाची अशी बाग होतांना
अचानक मला जाग येईल असंही कधी वाटल नव्हतं…..

-देवेंद्र चुरी

(ही कविता याआधी ऋतु हिरवा या पावसाळी विशेषांकातही प्रसिद्ध झाली आहे.)

lagna

Even this poem is from my friend, Rajani's blog:

लग्ना मॅहणजे एक सुंदर स्वपन


एक अटूत बंधन

दोन जीवांचे मिलन

नात्यांची नाजूक वीण

त्यावर विश्वासाचा घट्टा खांब


नवीन चाहूल,नवीन प्रवास

मैत्रीच्यारेशीम गाठीची सोबत

सामंजस्याचं खतपाणी

सुख-दुख चा चढ उतार


प्रेमाचा वर्षाव आन् मायेची पाखर

विचारांची देवाण-घेवाण

जणू एक जुळवाजुळवाच

निरागस प्रेम

One more poem I liked on another friends blog, http://rajanibhadale.blogspot.com/


एक निरागस प्रेम
काळत-नकाळात केलेल प्रेम
अडीच अक्षरसाठी झालेली जीवाची घालमेल!!!!

मनाच्या हलव्या कोपर्‍यात दडणारे
स्वप्नांच्या गोडी-गुलाबी दुनियेत फिरणारे
धबधब्या सारखे आंगवर शहरा आणणारे
सदा बहरणारे माझे-तुझे प्रेम!!!!!!!!!!!!

रतरणीच्यासुंगन्धप्रमाणे दरवळणारा तुझा सुवास
क्षणभर का होईना सुखवणारा तुझा सहवास
हृदयात कालवा-कालव् करणारे आन्
ओठांवर येताच गप्पा बसणारे निशब्द प्रेम!!!!!!!!

साधं सोपं आयुष्य

It's a lovely poem on my friend, Pooja's blog http://poojakg.wordpress.com/.

I liked it so thought of posting it on my blog as well.

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं…

आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक क1शाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं………