One more nice poem I found from the blog: http://davbindu.wordpress.com
तुला पहिल्या वेळी पाहिल्यावर
पुढे असं काही होईल, कधी वाटल नव्हतं
तू मला भेटण्याआधी खरंतर
प्रेम म्हणजे काय कधी कळलंच नव्हतं…
.
.
गर्दीत एकटा दिवस पुढे ढकलतांना
जीवनात अशी बहार येईल, कधी वाटल नव्हतं
खरंच तुझ्या भेटीनंतर जाणवलं
आजवरचं जगण हे तर जगंणच नव्हतं…
.
.
तुझ्या प्रत्येक गोष्टीत
मी असा गुंतेन, कधी वाटलं नव्हतं
तुझ्या त्या अथांग नजरेत हरवून
कसा तुझाच होत होतो हे समजतच नव्हतं…
.
.
तुझा सहवास, तुझा तो स्पर्श
असं वेड लावेल, कधी वाटलं नव्हतं
तुफ़ान पावसांतही कोरडा राहणारा मी
हलक्या सरीतही कसा भिजत होतो उमगतच नव्हतं…
.
.
व्याकुळ होऊन तुझी वाट पाहतांना
कोणासाठी असा झुरेन, कधी वाटल नव्हतं
आपल्या दुराव्याचा तो एक एक क्षण
असा मरणासारखा छ्ळेल हे खरंतर पटतंच नव्हतं…
.
.
माझ्या जीवनात कोणी अस हळुवार येऊन
माझ जीवनच बनून जाईल, कधी वाटल नव्हतं
अन माझ्या जीवनातील वाळवंटाची अशी बाग होतांना
अचानक मला जाग येईल असंही कधी वाटल नव्हतं…..
-देवेंद्र चुरी
(ही कविता याआधी ऋतु हिरवा या पावसाळी विशेषांकातही प्रसिद्ध झाली आहे.)
1 comment:
Thanks for sharing my poem on your blog...
Post a Comment